
सर्वांना प्रतिक्षा असलेल्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) म्हणजेच आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक नुकतंच जाहीर करण्यात आले. आगामी लीगच्या उद्घाटनाचा सामना गुजरात टायटन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवला जाणार आहे. 31 मार्च रोजी हा खेळला जाईल. लीगमधील पहिला सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
आयपीएलच्या सोशल मीडिया हँडलवरून याबाबतची अधिकृत घोषणा केली गेली. अहमदाबाद, मोहाली, लखनऊ, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, जयपूर, मुंबई, गुवाहाटी आणि धर्मशाळा या 8 स्टेडियमवर हे सामने खेळवले जातील.