देश

shree krishna: डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी… घराचे खोदकाम करताना सापडली 12 व्या शतकातील सुरेख कृष्णमूर्ती

चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात घराचे खोदकाम करताना निघाली सुरेख कृष्णमूर्ती, ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांच्या घरची घटना, मूर्ती बाराव्या शतकातील चालुक्य काळातील असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे (beautiful 12th century Krishna murti ). हे शिल्प दक्षिणात्य शैलीतील काळ्या दगडावर कोरलं आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर मुकुट आणि हातात बासरी आहे. ग्रामस्थांनी मूर्तीचा दुग्धाभिषेक केला. या भागात अधिक संशोधन केल्यास इतिहासाला मिळू शकतो उजाळा

चंद्रपूर जिल्ह्यात घरासाठी खोदकाम करताना सुरेख कृष्णमूर्ती आढळली आहे. ब्रह्मपुरी तालुक्यात येणाऱ्या खेडमक्ता येथील गजानन मानकर यांच्या घरी सापडलेल्या या मूर्तीने गावात आनंदोत्सव साजरा होत आहे. घर बांधकामासाठी खड्डा खोदणे सुरू असताना काळा दगड लागला. तो दगड बाहेर काढल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसला.

हा दगड म्हणजे श्रीकृष्णाचे सुरेख शिल्प होते. शिल्प सापडल्याची माहिती मिळताच गावकऱ्यांनी गर्दी केली. दुग्धभिषेक करत पूजा केली. ही मूर्ती बाराव्या शतकातील असून चालुक्य काळातील असल्याचं इतिहास अभ्यासकांचे मत आहे. खोदकामात श्रीकृष्णाचे शिल्प सापडण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. चंद्रपूर जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अश्मयुगाच्या खाणाखुणा चंद्रपुरात सापडतात. मौर्य, सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, चालुक्य, नाग, परमार, गोंड, भोसले यांची राजवट जिल्ह्यात होती. इतिहासाची साक्ष देत अनेक देखण्या वास्तू आजही जिल्ह्यात उभ्या आहेत.आता त्यात भर पडली आहे.

हे शिल्प दक्षिणात्य शैलीतील आहे. शिल्प काळ्या दगडावर कोरले आहे. श्रीकृष्णाचा डोक्यावर मुकुट असून हातात बासरी आहे. दोन्ही बाजूला दक्षिणात्य शैलीतील मंदिर कोरले आहे. चालुक्यकाळात या भागात श्रीकृष्णाच्या एखादं मंदिर असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक संशोधन केल्यास इतिहासाला उजाळा मिळू शकेलं अशी आशा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button