देश

SSC-HSC Exam : दहावी बोर्ड परीक्षेचं हॉल तिकीट मिळणार 6 फेब्रुवारीपासून, दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्चदरम्यान

दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल (SSC Exam Hall Ticket) तिकीट 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बोर्ड परीक्षेची हॉल तिकीट विद्यार्थ्यांसाठी 6 फेब्रुवारी दुपारी तीन वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध करुन दिली आहेत. सर्व माध्यमिक शाळांनी दहावी बोर्ड परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट प्रिंट करुन द्यायचे आहे.

हॉल तिकीट प्रिंट करुन देताना त्यासाठी कुठलेही शुल्क आकारु नये, सोबतच प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकाचा शिक्का मारुन स्वाक्षरी करावी, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. हॉल तिकीटामध्ये विषय आणि माध्यम यामध्ये बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करुन घ्यायच्या आहेत. हॉल तिकीटामध्ये फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख ,जन्मस्थळ या संदर्भात दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करुन त्याची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायचे आहे. प्रवेश पत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास, संबंधित माध्यमिक शाळांनी त्याची पुन्हा प्रिंट काढून त्यात लाल शाईने द्वितीय प्रत म्हणजेच डुप्लिकेट असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना हॉल तिकीट द्यायचे आहे.

6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून मिळणार हॉल तिकीट
दहावी बोर्डाच्या परीक्षा या 2 मार्च ते 25 मार्च दरम्यान होणार आहेत. त्याआधी विद्यार्थ्यांना सोमवारी 6 फेब्रुवारीला दुपारी तीन वाजल्यापासून हॉल तिकीट उपलब्ध करुन दिले जातील. त्यामुळे हॉल तिकीटामध्ये काही सुधारणा असतील तर त्यासाठी पुरेसा वेळ विद्यार्थ्यांकडे असणार आहे.

परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी संख्या!
औरंगाबाद विभागता दहावीसाठी एकूण 1 लाख 80 हजार 210 विध्यार्थी परीक्षा देणार असून, ज्यात औरंगाबाद जिल्ह्यातील 64 हजार 593, बीड 41 हजार 521, परभणी 27 हजार 800, जालना 30 हजार 676 आणि हिंगोली जिल्ह्यातील 15 हजार 620 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे. तसेच बारावीसाठी औरंगाबाद जिल्ह्यातील 60 हजार 400, बीड 38 हजार 929, परभणी 24 हजार 366, जालना 31 हजार 127 आणि हिंगोली जिल्ह्यातील 13 हजार 441 विद्यार्थ्यांनाचा समावेश आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button