देश

मराठवाडा साहित्य संमेलनात रावसाहेब दानवेंना डावललं; उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन

येत्या 10 आणि 11 डिसेंबर रोजी जालन्यातील घनसावंगीत 42 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे (marathwada sahitya sammelan) आयोजन करण्यात आलं आहे. या संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते होणार आहे. तर समारोप वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यामुळे या साहित्य संमेलनाकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. घनसावंगीतील संत रामदास महाविद्यालयात 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन 10 व 11 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोहिते असणार आहेत. शिवाजीराव चोथे या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.

या दोन दिवसीय साहित्य संमेलनाला जिल्ह्यातील पाचही आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे बबनराव लोणीकर, संतोष दानवे आणि नारायण कुचे यांचा समावेश असून काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांच्यासह राष्ट्रवादीचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांना निमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री आणि जालन्याचे खासदार रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनाच या साहित्य संमेलनातून डावलण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. निमंत्रण पत्रिकेत जालन्याचे खासदार असलेल्या रावसाहेब दानवे यांचेच नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे स्वरुप

या दोन दिवसीय साहित्य संमेलनात 300 ते 400 साहित्यिक, कवी सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 10 डिसेंबरला सकाळी 8.30 मिनिटांनी मावळते संमेलनाध्यक्ष बाबू बिरादार यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्‍घाटन होणार आहे. या संमेलनात संमेलनात कथाकथन, परिसंवाद, कविता वाचन, प्रकट मुलाखत असे कार्यक्रम असणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button