indiaदेश

काँग्रेसमधील फुटीच्या चर्चांना उधाण, अशोक चव्हाणांनी भेट घेतली का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “एका ठिकाणी…”

काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याच्या चर्चेवर स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच उत्तर दिलंय.

शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर आता काँग्रेसचे काही आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस आमदार अशोक चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याचंही बोललं जात आहे. या तर्कवितर्कांच्या पार्श्वभूमीवर आता स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच अशी कोणतीही भेट झाली नसल्याचं स्पष्ट केलं. ते शुक्रवारी (२ सप्टेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अशोक चव्हाण यांनी माझी कुठलीही भेट घेतलेली नाही. एका ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी मी पोहचलो आणि तेही पोहचले. ते दर्शन घेऊन निघाले तेवढ्यात मी पोहचलो. असं तर सगळ्यांचं होतं. मात्र, माझी आणि त्यांची कुठलीही भेट झालेली नाही.”

भाजपा नेते व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे महानगरपालिकेच्या विभागणीची गरज असल्याचं वक्तव्य केलं. यानंतर पुणे मनपाचे दोन भाग होणार का यावर चर्चांना उधाण आलंय.

पुणे मनपाचे दोन भाग होणार का?

पुणे मनपाचे दोन भाग होणार का? याबाबत फडणवीसांना विचारलं असता ते म्हणाले, “नवनवीन वादाचे विषय कशाला काढता? जेव्हा पुणे महानगरपालिकेचं विभाजन करायचं तेव्हा करू. आज तरी राज्य सरकारसमोर असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव येऊ शकतो हे खरं आहे. मात्र, आज तरी असा प्रस्ताव आलेला नाही.”

“वादाचे विषय काढू नका, आपल्याला विकासाकडे जायचं आहे,” असं म्हणत फडणवीसांनी अशी मागणी करणाऱ्यांना सूचक संदेश दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button