मुंबई पालिका निवडणुकीसंदर्भात सर्वात मोठी बातमी! शिंदे सरकारचा मविआला मोठा धक्का

मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात शिंदे सरकारने मोठा निर्णय घेतला असून मविआ सरकारला मोठा धक्का दिला आहे. 2017 च्या प्रभाग रचनेप्रमाणेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्वूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
मविआ सरकारने वाढविलेले वॉर्ड संख्या नियमबाह्य पद्धतीने केले असल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. 2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती तीच यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मविआ सरकारने नऊ प्रभाग वाढवले होते. पण शिवसेनेने त्यांच्या फायद्यानुसार वॉर्ड रचना केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे भाजपमध्ये नाराजी होती.
मुंबई शहर विभागात 3, पूर्व उपनगरात 3 आणि पश्चिम 3 असे नऊ प्रभाग वाढवण्यात आले होते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या भागात हे प्रभाग वाढवण्यात आले त्यामुळे याचा फायदा शिवसेनेला होणार होता.
वाढीप प्रभागानुसार मुंबई मनपात नगरसेवकांची संख्या 227 वरून 236 करण्यात येणार होती. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणानुसार मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवकांची संख्या नऊने वाढवण्याचा निर्णय मविआ सरकारने दिवाळीपूर्वी घेतला होता.