पोलिसानेच पाठवलेल्या पार्सलचा स्फोट; नागपूरचा VIP परिसर हादरला
नागपूर शहरातील सिव्हील लाईन परिसरात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसला आलेल्या एका पार्सलमध्ये झालेल्या अचानक स्फोटाने काल सायंकाळी एकच खळबळ नागपुरात उडाली.
हे पार्सल नाशिकहुन वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे नाशिकमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने हे पार्सल पाठवले होते. नाशिक मधील भद्रकाली पोलिस स्टेशनचे निरीक्षक ठाकूर काही काळ वर्धा जिल्ह्यात कार्यरत होते. त्याच दरम्यान त्यांची ओळख भाजपा पदाधिकारी बकाने यांच्याशी झाली होती.
वर्धा जिल्ह्यातील देवळी माकडांचा त्रास असल्याने त्यांना पळवण्यासाठी आवाज करणारी ही स्फोटके ठाकूर यांनी बकाने यांच्याकरता पाठविण्यात आली असल्याची ही माहिती पुढे आलीय.
नागपूरच्या Gpo अर्थात जनरल पोस्ट ऑफिसमध्ये काल संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास एक स्फोट झाला.आणि एकच खळबळ उडाली.. नाशिकवरून एक पार्सल वर्धा जिल्ह्यातील देवळीसाठी पाठवण्यात आलं होतं.तेच पार्सल नागपूरच्या जनरल पोस्ट ऑफिसच्या पार्सल हबमध्ये पोहोचल्यानंतर कर्मचारी त्याला हाताळत असताना त्यामध्ये छोटा स्फोट झाला. त्यामुळे कर्मचारी एकच घाबरले. सुदैवाने कुणी जखमी झाले नव्हते.
पोलिसांना त्याची सूचना देण्यात आली. सीताबर्डी पोलिस स्टेशनचा पथक तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी पोहोचले. ते पार्सल तपासण्यात आले असता त्यामध्ये शेतावर किंवा जंगलात जनावरांना पळवण्यासाठी जे अल्प ते मध्यम प्रतीचे स्फोटक वापरले जातात.
एका पोलीस निरीक्षकाने असे ज्वलनशील पदार्थ पार्सल ने कसे पाठविले असा सवाल आता उपस्थित होत आहे. त्यामुळे ठाकूर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
VIP परिसरात झालेल्या स्फोटाने खळबळ
जनरल पोस्ट ऑफिस सिविल लाइन्स परिसरात आहे. हा परिसर VIP आहे. रस्त्याच्या पलीकडेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे निवासस्थान आहे. जवळच विभागीय आयुक्त कार्यालय तसेच मंत्र्यांचे बंगले असलेलं रविभवन सर्किट हाऊस आहे.