bollywood

करण जोहरच्या पार्टीत सलमान आणि ऐश्वर्या आले समोरा-समोर, अन् अभिषेकने केले असे काही…

करणने २५ मे रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला.

बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहे. करणने २५ मे रोजी त्याचा ५० वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने करणने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत बॉलिवूडमधील जवळपास सर्वच कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी एकमेकांपासून बराच काळ लांब राहणारे सेलिब्रिटी देखील एकत्र दिसले.

या पार्टीत सर्वांच्या नजरा सलमान खान (Salman Khan) आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai Bachchan) यांच्यावर खिळल्या होत्या. सलमान त्याच्या बॉडीगार्डसोबत एकटाच पार्टीत पोहोचला होता, तर ऐश्वर्या आणि कतरिना त्यांचे पती अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) पोहोचल्या होत्या. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान आणि अभिषेक बच्चन पार्टीत एकमेकांसमोर आले होते. पण ते दोघे एकमेकांना ज्या पद्धतीने भेटले त्यावरून त्यांच्यात काही वाद किंवा वैर असतील असे वाटतं नव्हते.

‘पिंकव्हिला’ने दिलेल्या रिपोर्टनुसार, अभिषेक आणि ऐश्वर्या करण जोहरच्या पार्टीत रात्री १२.३० वाजता पोहोचले, तर सलमान रात्री १. १५ वाजता पोहोचला. सलमानला पाहताच अभिषेक त्याला भेटायला गेला आणि नंतर ते दोघेही डान्स फ्लोअरच्या दिशेने निघाले. जोपर्यंत अभिषेक आणि सलमान एकत्र होते, तोपर्यंत ऐश्वर्याने त्या दोघांपासून लांब होती.

सलमान आणि ऐश्वर्या जवळपास २ ते ३ वर्षे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. पण २००२ मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला. करण जोहरच्या पार्टीबद्दल बोलायचे झाले तर, करणने त्याची पार्टी यशराज स्टूडिओमध्ये अरेंज केली होती. या पार्टीला जवळपास पूर्ण बॉलिवूडने हजेरी लावली. त्यामध्ये आमिर खान, सैफ अली खान, करीना कपूर, मलाइका अरोरा, प्रिती झिंटा, क्रिती सेनॉन, अनुष्का शर्मा, रणबीर कपूर, शाहिद कपूर, अभिषेक बच्चन, ट्विंकल खन्ना, रणवीर सिंह या कलाकारांचा समावेश आहे. तसेच बॉलिवूड स्टार किड्समध्ये जाह्नवी कपूर, अनन्या पांडे, शनाया कपूर आणि सारा अली खान देखील तेथे उपस्थित होते. दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानानेही हजेरी लावली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button