देश

नव्या वादाला सुरूवात! शनिवारवाड्यातील पटांगणातला दर्गा काढण्याची मागणी

प्रतापगडावर अफजल खानच्या कबर (Afzal Khan Kabar) शेजारीच अतिक्रमणं काढल्यानंतर आत्ता पुण्यातील शनिवारवाडा (Shaniwar Wada) येथील पटांगणात असलेल्या हजरत ख्वाजा सय्यद शाह पीर मकबूल हुसैनी याचा जो दर्गा (Darga) आहे. तो दर्गा अनधिकृत असून याचा इतिहासाशी काहीही संबंध नाही तेव्हा हा दर्गा हटवण्यात यावा अशी मागणी हिंदू महासभेचे (Hindu Mahasabha) अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे. (mahasabha demands to remove darga near shaniwarwada)

तो दर्गा 1244 साली बांधण्यात आला आहे असा बोर्ड याठिकाणी लावण्यात आला आहे. वाड्याच्या पटांगणात जो दर्गा आहे तो अनधिकृत असून तो दर्गा हटवण्यात यावा तसेच प्रतापगडावर जिवा महाले यांचे स्मारक असावे या आमच्या मागण्या आहेत, असं यावेळी दवे यांनी सांगितलं.

शनिवार वाड्याचा मुख्य दरवाज्या (दिल्ली दरवाजा) (Delhi Darwaja) जवळ सुद्धा अगदी वाड्याच्या अंगणात पण एक छोटा दर्गा गेल्या अनेक वर्षात दिसायला लागला आहे. वाड्याच्या इतिहासात असा कोणताही दर्गा असल्याचा उल्लेख नाही आणि तसा तो असणं शक्य पण नाही. हे बांधकाम आपण पाहिले तर ते साधारण 30 वर्षांपूर्वीचे टाईल्स वापरून केले आहे. हा वाडा पुरातत्व खात्याच्या अधिकाराअंतर्गत येत असल्याने ते अश्या कोणत्याही बांधकामाला परवानगी देतील किंवा देऊ शकतील अशी शक्यता नाही. त्यामुळे या दर्ग्याचं सदृश छोटं बांधकाम पाडून टाकावे. भविष्यात इथे सुद्धा अतिक्रमण होऊन वाड्याच्या सुरक्षिततेला आणि सौंदर्यला बाधा येऊ शकते आणि हिंदवी साम्राज्यच्या वास्तूचे महत्व सुद्धा कमी होऊ शकते. तसं निवेदन पुरातत्व खाते आणि अतिक्रमण खात्याला दिले आहे. तसेच सैयद बंडाची कबर होऊ शकते तर आमच्या जिवा महाले यांची का नाही ? असं देखील यावेळी दवे यांनी सांगितलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button