देश
आताची मोठी बामती! राणा दाम्पत्याला पोलिसांकडून अटक
खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना खार पोलिसांनी (Khar Police) अटक केली आहे. 153 (A) या कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतल्या खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं