देश

एसटी संपाबाबत महत्वाची बातमी, विलीनीकरण अहवालावर 22 फेब्रुवारीला सुनावणी

एसटी संपाबाबत (ST Strike ) तोडगा काढण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला आहे. या अहवालासोबतच मुख्यमंत्र्यांचा अभिप्रायही खंडपीठासमोर ठेवण्यात आला. आता या प्रकरणावर 22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. (ST strike : hearing on merger report on 22 February)

विलिनीकरणासंदर्भात आपल्या बाजूने निकाल लागला नाही तर आंदोलन चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आंदोलक मुंबईत जमा होण्याची शक्यता आहे. आंदोलकांना टोलनाक्यांवरच रोखण्यात यावे असे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत.

तसेच संप करणारे एसटी कर्मचारी आंदोलक मुंबईत मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान, मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणी जमण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरांमध्ये बंदोबस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button