india

एकेकाळी रायडर्स ग्रुपकडून मिळाला होता नकार, आता तरुणांसाठी झालाय Inspiration

मी छोट्या मोठ्या राइड भरपूर केल्या. पण, मला आता बाहेर पडायचं होतं, नवनवीन ठिकाणं खुणावू लागली होती. त्यासाठी कुठल्यातरी रायडर ग्रुपमध्ये असणं आवश्यक होतं. सोशल मीडिया आणि प्रत्यक्षरित्या अनेकांना भेटलो. पण, प्रत्येकाने विशिष्ट बाईकच हवी असल्याच सांगत नकार दिला. यामुळे मी निराश झालो. अन् त्याच दिवशी ठरवलं..

रायडरचे पाय पाळण्यात

प्रत्येकाला लहानपणापासूनच कसल्या ना कसल्या गोष्टीचं वेड असतं. मलाही शाळेत असल्यापासून गाड्यांची फार आवड होती. माझ्या अभ्यासाच्या वह्या मागच्या बाजूने लवकर भरायच्या, कारण मी सतत मला आवडणार्‍या नवीन नवीन गाड्यांची चित्र काढत असे. पॉकेट मनी साठवून रद्दीच्या दुकानातून “Overdrive” आणि “Autocar India” ची मासिक घ्यायचो. एव्हाना घरातल्यांना समजून चुकलं होतं की मला चित्रकला आणि गाड्यांमध्ये जास्त रस आहे.

आठवीत दिवाळीच्या सुट्टीत मामाकडं रहायला गेलेलो, तेव्हा हट्ट करून मामाची splendor चालवायला शिकलो. बाइक बद्दलचं माझं आकर्षण बघून बाबांनी आमची पहिली बाइक घ्यायचा निर्णय घेतला. दोन-तीन आठवडे सगळीकडे चौकशी करून मी Karizma आणि Unicorn असे दोन पर्याय ठेवले, पण सी. सी. लक्षात घेता Unicorn घरात आली. मग जशी संधी मिळेल तशी मी कधी चोरून तर कधी परवानगी घेऊन बाइक चालवायला लागलो. अठराव्या वाढदिवसाच्या दुसर्‍याच दिवशीच लायसन्ससाठी अर्ज केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button