देश

ज्या पायऱ्यांवर शिवसैनिकांकडून धक्काबुक्की तिथेच सोमय्यांचा सत्कार

काही दिवसांपूर्वी भाजपचे (Bjp) माजी खासदार आणि नेते किरीट सोमय्या (kirit Somaiya) यांना शिवसैनिकांनी (Shivsena) धक्काबुक्की करण्यात आली होती. या मारहाणीत किरीट सोमैय्या यांना दुखापत झाली होती. पुणे महापालिकेच्या आवारात त्यांना ही धक्काबुक्की करण्यात आली. त्याच पायऱ्यांवर सत्कार करण्यात आला आहे. यावेळेस भाजपकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं गेलं. (bjp felicitates kirit somaiya on steps of pune municipal corporation)

या दरम्यान पालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप नगरसेवंकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजप कार्यकर्त्यांनी त्याच पायऱ्यांवर ठिय्या धरला .

नक्की काय झालं होतं? 

 

सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटलच्या कामात गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. याबाबत सोमय्या निवेदन देण्यासाठी मागील शनिवारी पुणे महापालिकेच्या कार्यालयात आले होते.

यावेळेस पायऱ्यांवर एकच खळबळ उडाली. त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की केली गेली. हा सर्व प्रकार पालिकेच्या पायऱ्यांवर घडला. या घटनेनंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत या सर्व प्रकाराचा निषेध नोंदवला. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेत चांगलीत हमरीतुमरी पाहायला मिळाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button