देश

Vande Bharat : मध्य प्रदेशात वंदे भारत एक्स्प्रेसला आग; दिल्लीला जात होती ट्रेन

मध्य प्रदेशच्या भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनच्या डब्याला सोमवारी सकाळी आग लागली. गाडी पूर्वी हबीबगंज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी कमलापती स्थानकावरून नवी दिल्लीतील निजामुद्दीनच्या दिशेने निघाली तेव्हा एका डब्याला आग लागली. कुरवई स्थानकाजवळील कोच क्रमांक 14 मध्ये बॅटरीमध्ये ठिणगी पडल्याने ही आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.

राणी कमलापती स्थानकावरुन निजामुद्दीनला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनला आग लागली होती. कोचच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्किटने ही आग लागल्याचे म्हटलं जात आहे. या आगीतनंतर ट्रेनच्या C-14 कोचमध्ये बसलेले सर्व 36 प्रवाशांना सुखरूप खाली उतरवण्यात आले आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे.

मध्य प्रदेशातील कुरवई केथोरा स्थानकाजवळ वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांच्या पथकाला तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. “कुरवाई केथोरा स्टेशनवर वंदे भारत एक्स्प्रेसच्या एका डब्याच्या बॅटरी बॉक्समध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आग विझवली,” असे रेल्वेने एका निवेदनात म्हटले आहे. या आगीच्या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. व्हिडीओमध्ये एका डब्यात आग लागल्याचे दिसत आहे. तर काही लोक आग विझवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे म्हणणे आहे की, डब्यातील सीटखालून कसलातरी आवाज येत होता. आवाज ऐकून प्रवासी घाबरले आणि तेथून पळ काढला. ट्रेन थांबल्यावर बॅटरीला आग लागल्याचे दिसून आले. या ट्रेनमध्ये आयएस अविनाश लावनिया, काँग्रेस नेते अजय सिंह यांच्यासह अनेक व्हीआयपी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच संपूर्ण ट्रेन रिकामी करण्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये मध्य प्रदेशातील राणी कमलापती रेल्वे स्थानक आणि दिल्लीतील हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकादरम्यान वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सेवेचे उद्घाटन केले. ट्रेन 7 तास 30 मिनिटांत 701 किलोमीटर अंतर कापते आणि शनिवार वगळता सर्व दिवस धावते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button