मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विधानसभेतून विरोधकांचा सभात्याग

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलेच ठणकावलं. ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (,Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या निवदेनानंतर विरोधी पक्षाने विधानसभेतून सभात्याग केला.
ईडी आहे की घरगडी? कुटुंबीयांची बदनामी कशासाठी ? असा सवालही त्यांनी केलाय. सत्तेच्या प्रयोगावरून त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला. दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर जोरदार टीका केली. तसेच विरोधकांच्या आरोपांना उत्तर न दिल्यामुळे भाजपने विधानसभेतून सभात्याग केला.
विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या भाषणाने गाजला. हिम्मत असेल तर मला तुरुंगात टाका, मात्र सत्तेसाठी उगीचच बदनामी करू नका अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलंय. ईडीच्या कारवाईनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आक्रमक पवित्रा घेत विरोधकांना सडेतोड उत्तर दिलं. ईडी आहे की घरगडी? कुटुंबीयांची बदनामी कशासाठी ? असा सवालही त्यांनी केलाय. सत्तेच्या प्रयोगावरून त्यांनी फडणवीसांनाही टोला लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर चौफेर हल्ला केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले. राज्याची प्रगती विरोधकांना दिसत नाही, असा टोला त्यांनी भाजपला लगावला. त्यांनी भाजपशासित मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील आकडेवारीचा संदर्भ देत राज्यात सर्वांत कमी मद्याची दुकाने असल्याचा दावा त्यांनी केला.