देश

रुग्णालयाबाहेर दिसला भिकारी; त्याला पाहाताच महिलेच्या डोळ्यात अश्रू, 10 वर्षांपूर्वी हरवलेला तो…

आजारी असल्याने उपचारासाठी रुग्णालयात जात असतान एका महिलेच्या नजरेस रुग्णालयाबाहेर एख भिकारी (Begger) बसलेला दिसला. फाटके कपडे, शरीराचा सांगाडा झालेला, केस विस्कटलेल्य अवस्थेत असलेल्या त्या भिकाऱ्याची मानसिक अवस्थाही ठिक नव्हती. खोल गेलेल्या डोळ्यातून तो येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे पाहात होता. कोणी काही खायला देईल का अपेक्षेने तो प्रत्येकाके पाहात होता. रुग्णालयात जाणाऱ्या महिलेला भिकाऱ्याचा चेहरा ओळखीचा वाटला. तीने त्याच्याकडे निरखून पाहिलं आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिला लागले. तो भिकारी तिचा 10 वर्षांपूर्वी हरवलेला पती होता. ओळख पटताच महिलेने त्याला मिठी मारली. (woman found her missing huband after 10 years )

भिकाऱ्यासमोर बसून रडणाऱ्या त्या महिलेला पाहाताच लोकांची गर्दी झाली. लोकांनी याबाबत त्या महिलेला विचारलं, खरी गोष्ट कळाल्यावर लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले. आम्हाला सोडून कुठे निघून गेला होतात? का गेला होतात? असे अनेक प्रश्न ती महिला त्याला विचारत होती, पण तो व्यक्ती बोण्याच्या मनस्थितीत नव्हता. उत्तरप्रदेशमधल्या कानपूरमधली ही घटना आहे.

त्यानंतर महिलेने स्वत:ला सावरत एका कपड्याने त्याचं संपूर्ण शरीर साफ केलं.त्यानंतर महिलेने मोबाईलवरुन आपल्या मुलांना फोन केला आणि एक कुर्ता आणि पॅन्ट आणण्यास सांगितलं. त्यानंतर एक तरुण बाईक घेऊन तिथे पोहोचला आणि त्या महिलेला आणि त्या व्यक्तिला आपल्या बरोबर घेऊन गेला. या दरम्यान गर्दीतला काही लोकांनी त्यांचे व्हिडिओ आणि फोटो काढले. त्यातला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही गोष्ट कळताच ही महिला आणि तो व्यक्ती कोण होता याची शोध सामाजिक संस्था घेत आहेत. त्या व्यक्तीच्या पुढील उपचारासाठी काही मदत करता येईल का यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

मध्यप्रदेशमध्येही अशीच घटना
मध्यप्रदेशच्या ग्वालियअरमध्येही काही महिन्यांपूर्वी अशीच घटना घडली होती. जिल्ह्यातल्या डीएसपीच्या नजरेस रस्त्याच्या बाजूला बसलेला एक भिकारी दिसला. ते त्या व्यक्तीच्या जवळ गेले असता त्यांना धक्काच बसला. कारण तो त्यांच्या बॅचचा अधिकारी होता. ग्वालिअरमधल्या निवडणुकीनंतर पोलीस अधिकारी रत्नेश सिंह तोमर आणि विजय सिंह हे दोघं कारने झांसी रोडवर जात होते. यावेळी त्यांना रस्त्याच्या किनारी एक भिकारी थंडीत कुडकुडत असल्याचं दिसलं. त्याला पाहिल्यावर काही मदत करता येईल का म्हणून रत्नेश सिंह आणि विजय सिंह त्या व्यक्तीजवळ पोहेचले.

त्या व्यक्तीला थंडी वाजत असल्याने अधिकाऱ्यांनी त्याला आपल्याजवळचं जॅकटे आणि बूट दिले. त्याच्याशी बोलत असताना त्यांना जी माहिती मिळाली ती ऐकून त्यांना धक्का बसला. तो व्यक्ती पोलीस ऑफिसर मनीश मिश्रा होता. मानसिक स्थिती बिघडल्याने तो गेल्या दहा वर्षांपासून रस्त्यावर फिरत होते. 2005 पर्यंत मनिष मिश्रा यांनी पोलीस विभागात नोकरी केली. त्यानंतर काही कारणाने त्यांची मानसिक स्थिती बिघडत गेली. यातच त्यांची पत्नी त्यांना सोडून गेली आणि नोकरीही गेली. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती आणखीनच खालावली आणि त्यांनी भिक मागायला सुरुवात केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button