देश

मुंबईत 6 मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी चाचणी

Coronavirus vaccine for kids : कोरोनाच्या साथीत एक मोठा दिलासा देणारी बातमी. (Coronavirus News) मुंबईतील नायर हॉस्पिटलमध्ये 6 मुलांच्या कोरोना लसीची (Child Corona vaccination) यशस्वी ट्रायल घेण्यात आली आहे. 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोरोना लस दिली. त्यांच्यावर कोणतेही परिणाम दिसून आलेले नाहीत. त्यामुळे आता मुलांना लस देण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. (Mumbai: BMC begins trials of vaccine on kids at Nair Hospital)

कोरोना लसीची चाचणी घेण्याची परवानगी केंद्रीय आरोग्यमंत्रालयाकडून देण्यात आली होती. त्यानुसार नायर हॉस्पिटलमध्ये सहा मुलांच्या कोरोना लसीची यशस्वी ट्रायल झाली.12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर लसीची ट्रायल घेण्यात आली होती. केवळ 4 दिवसात ही ट्रायल घेण्यात आली आहे.

दरम्यान, मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नोंदणी सुरूच आहे. पालक – मुलांनी यासाठी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, असे आवाहन मुंबई महापालिका वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोनावर मात करण्याचासाठी प्रतिबंधात्मक लस नागरीकांना देण्यात आली. सुरूवातीला ही लस 60 वर्षांवरील व्यक्तींना देण्यात आली. त्यानंतर 45 वय वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सरकारने परवानगी दिली. त्यानंतर 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस देण्यात आली. त्यानंतर 18 वर्षांवरील तरूणांना लस देण्यास मंजूरी दिली. 12 ऑक्टोबरला 2021 रोजी 2 ते 18 वय वर्ष गटातील मुलांना लस देण्यास परवानगी दिली. त्यानुसार मुंबईत मुलांवर यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button