म्हणाले- ईडीच्या माध्यमातूनच नारायण राणे भाजपमध्ये गेले; अजून एक धक्कादायक माहिती समोर येणार असल्याचाही केला दावा
अँटेलिया स्फोटक प्रकरण आणि सचिन वाझेच्या चौकशीसंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर येणार आहे, असा दावा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलते होते.
नवाब मलिक यांनी परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांवरही गंभीर आरोप केले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचे कारस्थान परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी रचल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सगळे प्रकार राजकीय हेतून झाले आहेत. अँटेलियाबाहेर स्फोटके ठेवण्याचा कट परमबीर सिंग आणि सचिन वाझे या दोघांनी मिळून रचला, असा त्यांनी दावा केला आहे.
‘ईडीच्या माध्यमातून राणे भाजपामध्ये गेले’
ईडीबाबत देखील भविष्यात मोठा धमाका करणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले. ‘ईडीच्याबाबतीत आमचा शोध सुरू आहे. भविष्यात त्याबाबत मोठा धमाका होणार आहे. केंद्र सरकार म्हणेल तसे विभाग चालतो. राणेंना आलेल्या ईडीच्या नोटिशीचे काय झाले हे कुणाला माहितीच नाही. ईडीच्या माध्यमातून नारायण राणे भाजपमध्ये गेले. ईडीच्या माध्यमातून गुजरातमधील काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस सोडली. बंगालमध्ये टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला. त्यानंतर पुन्हा घरवापसी झाली. ईडीच्या यंत्रणेचा गैरवापर होतच आहे असेही नवाब मलिक यांनी म्हटले.