देश

ST Bus Strike : एसटी विलीनीकरणाच्या मुद्दयावर शरद पवार यांचं मोठं विधान

राज्यात गेल्या चौदा दिवसांपासून विलीनीकरणाच्या मागणीसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी कर्मचारी शिष्टमंडळ आणि परिवहन मंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. वेतनवाढीच्या तोडग्यानं संप मिटणार का? याकडे लक्ष लागलं. बैठक सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत मोठं विधान केलं आहे.

राज्यात एसटीची आर्थिक स्थिती खूप वाईट आहे. एसटीच्या संपावर मी परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी चर्चा केली. एसटी कधी राज्य सरकारचा आधार घ्यावा लागला नाही. इतक्या वर्षात कधीच राज्य सरकारचा आधार घेतला नाही. एसटीबाबत सामान्य माणसाचं मतही महत्वाचं आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एसटीचं अर्थकारण कसं सुधारायचं यावर चर्चा झाली. पाच राज्यांचं वेतन तपासलं, गुजरातचं वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. बाकीच्या राज्यांच्या कर्मचाऱ्यांचं वेतन महाराष्ट्रापेक्षा कमी आहे. वेतनाचा फरक आहे तो भरुन काढा, इतर राज्यांचं वेतन पाहून त्यावर मी पर्याय सांगितल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

एसटीचं विलीनीकरणावर बोलताना शरद पवार यांनी एसटीचं विलीनकरण केल्यास बाकीच्या महामंडळाचंही विलीनीकरण करावं लागेल असं म्हटलं आहे. विलीनीकरणाचा मुद्दा कोर्टात त्यावर आता बोलणार नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button