देश

मुंबई लोकलमधील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय

Mumbai local travel news : कोरोचा उद्रेक (Coronavirus) कमी झाला असला तरी धोका टळलेला नाही. आता मुंबई लोकलमधील (Mumbai local travel) गर्दी नियंत्रित करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही ‘यूनिव्हर्सल पास’ सक्तीचा करण्यात आला आहे. (Maharashtra Government Universal Pass) तसेच दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. लोकलमधील (Mumbai local) गर्दी रोखण्यासाठी राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाही आता रेल्वे प्रवासासाठी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असणे गरजेचे आहे. राज्य सरकारने परिपत्रक जारी करून हा नवा नियम लागू केला आहे. यापूर्वी केवळ एक डोसवर किंवा लसीच्या कोणत्याही बंधनाशिवाय या कर्मचाऱ्यांना रेल्वे पास दिला जात होता. मात्र आता लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यांनाच युनिव्हर्सल पास दिला जाणार आहे.

दरम्यान, मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने सावध पवित्रा घेतला आहे. खास कोरोनासाठी उभी केलेली आरोग्य यंत्रणा जम्बो सेंटरसह सुरू ठेवण्यात येणार आहे. निर्बंध शिथिल असले तरी नागरिकांनी जबाबदारीने वागले पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी आवश्यक नियम काटेकोरपणे पाळले पाहिजे असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे रुग्णवाढ ओसरताच मुंबईकरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवली आहे. दुसऱ्या डोसची तारीख टळूनही 3 लाख मुंबईकरांनी दुसरा डोस घेतलाच नाही. 97 टक्के मुंबईकरांनी पहिला डोस घेतलाय. 55 टक्के नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये सर्वाधिक साडे एकोणतीस लाख नागरिकांचं लसीकरण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button