देश

दिवाळीचा फराळ महागला, कोरोना आणि लॉकडाऊनचा खाद्य पदार्थांनाही फटका

Inflation News : यंदा दिवाळीचा (Diwali) फराळ महागला आहे. इंधन दरवाढ, लॉकडाऊनमुळे फराळासाठी (Diwali Faral) लागणारे विविध जिन्नसांचे भाव वाढलेत. त्यातच कोरोना, लॉकडाऊनचा खाद्य पदार्थांनाही फटका बसला आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ महागला आहे. (Diwali Faral Price Rise) खाद्यतेलासह विविध जिन्नस महागले आहेत. खाद्यतेलासह विविध जिन्नसही महागले आहेत. खोबऱ्यानेही भाव खाल्ला आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे खरेदीवर मर्यादा आल्या आहेत.

महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर लिटरल मागे 100 रुपयांच्यावर गेले आहेत. याचा फटका हा वाहतूक व्यवसायाला बसला आहे. वाहतुकीचे दर वाढल्याने खाद्य पदार्थांच्या किमतीवर याचा परिणाम दिसून येत आहे. त्यामुळ महागाईत अधिक भर पडत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. तेल, खोबरे, तांदूळ, ज्वारी, बाजरी, डाळी आदींच्या भावात वाढ झाली आहे. (Inflation – Diwali festivities hit expensive, Corona and Lockdown hit food)

खाद्यतेलाचे चढे दर आणि विविध जिन्नसांच्या किंमतीत झालेली वाढ यामुळे दिवाळीच्या फराळासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्वच जिन्नसांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तेल, तूप, बेसन, मैदा, चणाडाळ, सुकामेवा महाग झाला आहे. फराळाचे दर 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहेत.

फराळाच्या दरांवर एक नजर
– चिवडा 320 रुपये किलो
– चकली 440 रुपये किलो
– शेव 340 रुपये किलो
– बेसन लाडू 330 रुपये किलो, 1 नग 22 रु
– रवा लाडू 380 रुपये,1 नग 25 रु
– ओल्या नारळाची करंजी 7 नग 120 रु

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button