देश

मुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले

ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. मात्र अवकाळी पाऊस जाण्याचे नाव घेत नाही. देशातील अनेक राज्ये या अवकाळी पावसाच्या वेदना सहन करत आहेत आणि उत्तराखंड आणि केरळची स्थिती सर्वात वाईट आहे. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. या जोरदार पावसाचा मोठा तडाखा अनेक राज्यांत बसला आहे. उत्तराखंडात ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे. चारधाम यात्रेसाठी गेलेले हे भाविक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत.

महाष्ट्रात उत्तर भागात आणि विदर्भ, मराठवाड्यात बसला आहे. तर केरळ राज्यातही पावसाचा कहर पाहायला मिळाला आहे. आता तर उत्तराखंडमध्ये पावसाचा जोरदार तडाखा बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसामुळे उत्तराखंडमधील परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे भूस्खलनच्या घटनाही घडल्या आहेत. पूर आणि पावसामुळे आतापर्यंत 40 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये नैनीतालमध्ये जास्तीत जास्त 25 मृत्यू झाले आहेत.

अनेक राज्यांतील पर्यटक अडकले
मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. नदीच्या प्रवाहामुळे अनेक भागात पूल तुटले आहेत. यामुळे स्थानिक लोक आणि पर्यटक अडकून पडले आहेत. लोकांना बाहेर काढण्यासाठी हवाई दल तैनात करण्यात आले आहे. उत्तराखंडमध्ये ढगफुटीच्या प्रकोपामुळे चारधाम यात्रेसाठी नाशिकमधून गेलेले जवळपास दोनशे भाविक अडकलेत. यापैकी नैनिताल परिसरातील 27 जण आपत्कालीन विभागाच्या जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. काही पर्यटक खाजगी गाड्या करून तर काही पर्यटन व्यावसायिकांकडून गेल्याने त्यांचा आकडा मिळणं अवघड बनलेय.

नैनीतालमध्ये मुसळधार पावसामुळे आक्रोश
मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे नैनीतालकडे जाणाऱ्या तीन रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, यामुळे या पर्यटनस्थळाचा राज्याच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी डेहराडूनमध्ये सांगितले की ढगफुटी आणि भूस्खलनानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. धामी यांनी आश्वासन दिले की राज्यात सुरू असलेल्या मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी लष्कराची तीन हेलिकॉप्टर लवकरच येतील. यापैकी दोन हेलिकॉप्टर नैनीतालला पाठवण्यात येतील, जिथे मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button