देश

कॉर्डेलिया क्रुजमध्ये NCB ची कारवाई! शिपवर होणाऱ्या ड्रग पार्टीचे नियोजन उधळले

नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने मुंबई पोर्टमध्ये कॉर्डेलिया क्रुजमध्ये एक प्रमुख ड्रग कार्टेलला उघडकीस आणले आहे. 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या कारवाईमध्ये एजेंसीला माहिती मिळाली की, मुंबईहून गोवा जाणाऱ्या एका शिपमध्ये ड्रग पार्टी होणार आहे. यामुळे NCB चे काही अधिकारी या शिपवर प्रवाशी बनून सामिल झाले. त्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रवाशी बनून कॉर्डेलिया क्रुजमध्ये प्रवेश केला. या मोठ्या क्रुजवर होणाऱ्या हायप्रोफाईल ड्रग पार्टीच्या आधीच त्यांनी छापेमारी सुरू केली. यामध्ये विविध प्रकारचे आमली पदार्थ जप्त केले.

दरम्यान कंपनीचे प्रेसिडेंट आणि सीईओ जरगेन बेलम यांनी म्हटले आहे की, नॉर्कोटिक्स डिपार्टमेंटने काही प्रवाशांकडून ड्रग जप्त केले आहेत. या प्रवाशांना तत्काळ क्रुजमधून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनाक्रमामुळे आमच्या सेलवर परिणाम झाला आहे. या प्रवाशांमुळे आमची क्रुज उशीरा निघाली. त्यामुळे इतर प्रवाशांची आम्ही माफी मागतो.

एनसीबेच जनरल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी ही कारवाई घडवून आणली आहे. ते आपल्या टीमसोबत मुंबईमधील क्रुजमध्ये सामिल झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button