देश

DELTA : सरकारचा मोठा निर्णय, दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी नवी नियमावली

परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांसाठी सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. बाहेरुन महाराष्ट्रात येणाऱ्या लोकांसाठी सरकारने काही निर्बंध घातलून दिले आहेत. परराज्यातून येणाऱ्या लोकांनी दोन डोस घेणं गरजेचं असणार आहे. दोन डोस घेतलेल्यांना महाराष्ट्रात येण्याचा प्रवास करता येणार आहे. लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट जवळ बाळगणं अनिवार्य असणार आहे.

तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका कायम असल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणाऱ्यांना लस घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा आरटी-पीआर निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट सीमेजवळ दाखवावा लागणार आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची आकडेवारी स्थिर आहे. रोज 7 हजारांच्या जवळपास रुग्णसंख्या आढळत आहे. दुसरी लाट ओसरल्याचं दिसत असताना तिसऱ्या लाटेची शक्यता देखील कायम आहे. परराज्यातून येणाऱ्या लोकांमुळे संसर्गचा धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे.

राज्यात दिवसभरात 6,686 नवीन रुग्णांची नोंद झाली. करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 63,82,076 झाली आहे.

दरम्यान, राज्यात डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या पाच मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. आतापर्यंत 66 डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्णांची राज्याच्या आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button