देश

Pune : मद्यधुंद तरुणीचा रस्त्यावर धिंगाणा, व्हिडिओ होतोय व्हायरल

भररस्त्यात तरुणींने धिंगाणा ( Drunk young woman) घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. रस्त्याच्या मधोमध ही मद्यधुंद तरुणी आडवी झाली होती. ती इतकी नशेत होती की तिला उभेही राहता येत नव्हते. हिराबाग चौक येथे मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर धिंगाणा घातल्याने बघ्यांची गर्दी झाली होती. दरम्यान, पोलीस घटनास्थळी हजर होत तरुणीला ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या महिला पथकाकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे. ( Drunken Girl Creating Scene at Pune )

मद्यधुंद तरुणीने रस्त्यावर गोंधळ घातल्याने एकच धावपळ उडाली. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमाराला टिळक रोडवरील हिराबाग चौकात ही तरुणी रस्त्यावरील वाहने अडवण्याचा प्रयत्न करत होती. नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर तिला रस्त्याच्या बाजूला घेण्यात आले. या प्रकारामुळे रस्त्यावर चांगलीच गर्दी झाली होती. सध्या या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button