देश

मुंबई – गोवा महामार्ग बंद; चिपळूणचा वाशिष्ठी पूल खचल्यामुळे मोठा धोका, वाहनांच्या रांगा

Chiplun flood : चिपळूण, खेड, संगमेश्वरमध्ये पावसाचे तांडव पाहायला मिळाले. (Heavy rains in Chiplun) चिपळूणमध्ये आलेल्या पुरामुळे हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले होते. आता पूर ओसरल्याने चिपळूणमध्ये जागोजागी एनडीआरएफचे बचावकार्य सुरू आहे. (Heavy rains in Chiplun, Maharashtra ) कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. मुसळधार पावसाचा चांगलाच तडाखा बसल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तसेच या पावसाचा फटका मुंबई – गोवा महामार्गालाही बसला आहे. चिपळूण येथे वाशिष्ठी पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती भयानक झाली आहे. चिपळूणला महापुराचा विळखा बसला होता. संपूर्ण पाण्याने वेढले गेले आहे. हजारो लोक पुरात अडकले होते. एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. त्यांच्या मदतीने इथल्या लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसापासून मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या रंगाच रांगा लागल्या आहेत. चिपळूणचा वाशिष्टी पूल खचल्यामुळे या ठिकाणची वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच कुंभार्ली घाट आणि आंबा घाटावर देखील दरड कोसळत असल्यामुळे येथील वाहतूक गेल्या चार दिवसांपासून बंद आहे.

तर सिंधुदुर्गातील आंबोली घाट देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सगळीकडे अवजड वाहन थांबून ठेवण्यात आली आहेत. चिपळूण येथील मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या ट्रक चकलांचे खाण्या-पिण्याचे देखील हाल झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button