देश

ठाणे: कळव्यात दरड कोसळून एकाच कुटुंबातील पाच जण ठार, दोन जखमी

गेल्या तीन दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दुर्घटनांची मालिका सुरू असून आज ठाणे महापालिका हद्दीत कळवा घोलाईनगर येथे घरावर दरड कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

घोलाईनगर येथील दुर्गा चाळीवर ही दरड कोसळली असून ढिगाऱ्याखाली सात जण अडकले होते. त्यातील दोन जणांना वाचवण्यात यश आले असून अन्य पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वजण एकाच कुटुंबातील असून मृतांमध्ये एका तीन वर्षीय बालिकेसह तीन लहान मुलांचा समावेश आहे. जखमींना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

१. प्रभूसुदन यादव (४५)
२. विधावतीदेवई प्रभू यादव (४०)
३. रविकिशन यादव (१२)
४. सिमरन यादव (१०)
५. संध्या यादव (३ )

जखमींची नावे:

१. प्रिती यादव (१०)
२. अचल यादव (१८)

ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळत असून यामुळेच कळवा येथील दुर्घटना घडली आहे. आज दुपारी ही दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, रेस्क्यू वाहन, दोन अॅम्ब्युलन्स, दोन जीप आणि दोन टेम्पो यासह टीम घटनास्थळी दाखल झाली. अजूनही घटनास्थळी मदतकार्य सुरू असून या घटनेनंतर डोंगराला लागून असलेल्या भागांना सतर्क करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button