सर्वात मोठी बातमी! दहावीचा निकाल उद्या
कोरोनामुळे आतापर्यत दहावीचा निकाल रखडला होता. हा निकाल कधी आणि कसा लागणार याकडेच सर्व विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागूण राहीले होते. परंतु अखेर आता ही प्रतिक्षा संपली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला इयत्ता १०वीचा ऑनलाईन निकाल उद्या दि. 16 जुलै,2021 रोजी दुपारी 1.00 वा. जाहीर होईल. अशी सुचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून देण्यात आली आहे
परंतु हा निकाल कसा लावण्यात येईल आणि मुल्यमापनासाठी कोणता फॉर्म्यूला वापरला जाईल याबद्दल लोकांच्या मनात संभ्राम आहे. तर या निकालात 50 गुण नववीच्या परीक्षेच्या आधारावर, तर 30 गुण सराव परीक्षा आणि 20 गुण अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत आहे आणि या सगळ्यावर आधारीत हा निकाल जाहीर होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र 10 वी लेखी परीक्षा दिनांक 29-04-2021 ते 20-05-2021 या कालावधीत आयोजित करण्यात आली होती परंतु कोव्हिड प्रोटोकॉलमुळे ही परीक्षा 12 मे 2021 रोजी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर 24 मे 2021 ला 10वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर करण्यात आली.
त्यानंतर 10 जून 2021 रोजी सर्व शिक्षकांना मूल्यमापन पद्धतींबाबत प्रशिक्षण देण्यात आले आणि मग विद्यार्थ्यांचे गुण संगणक प्रणाली मार्फत 12 जुन ते 02 जुलै 2021 पर्यंत भरण्यात आले.
त्यानंतर 03 जुलै ते 15 जुलै 2021 पर्यंत अखेर निकाल जाहीर करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ज्यानंतर 16 जुलै म्हणजे उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
सन 2021 मध्ये इयत्ता 10 वीला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या 16 लाख 58 हजार 624 आहे. त्यात 9 लाख 9 हजार 931 मुले आणि 7 लाख 47 लाख 693 मुलींचा समावेश आहे.