अपराध समाचारदेश

धक्कादायक! MRI स्कॅनिंग मशीनमध्ये महिलेचा मृत्यू; पतीचे Diagnostic Centre वर गंभीर आरोप

आंध्र प्रदेशमधील एलुरु येथे एका 61 वर्षीय महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एमआरआय स्कॅनिंग सुरु असतानाच या महिलेने प्राण गमावले. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेला हृदयासंदर्भातील समस्या होता. या महिलेवर डायलेसीसही करण्यात आलं होतं. तिच्या हृदयामध्ये पूर्वीच शस्रक्रीया करुन पेसमेकर बसवण्यात आलेलं. मृत महिलेच्या पतीने डायग्नोस्टीक सेंटरमधील कर्मचाऱ्यांनी योग्य काळजी न घेतल्याने पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.

कर्मचाऱ्यांना ही गोष्ट कळलीच नाही की…

पत्नीच्या शरीरामध्ये पेसमेकर असल्याचं या कर्मचाऱ्यांना कळलं नाही आणि त्यांनी कोणतीही खबरदारी न घेता एमआरआय स्कॅन केल्यानेच पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप पतीने केला आहे. अनेक दिवसांपासून थकवा जणवत असल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने या महिलेला एमआरआय काढण्यास सांगितला होता. मात्र एमआरआयची प्रक्रिया सुरु असतानाच तिने प्राण सोडला.

पतीने केला गंभीर आरोप

पतीने दिलेल्या माहितीनुसार, एमआरआयची प्रक्रिया सुरु झाली तेव्हा महिलेची प्रकृती उत्तम होती. मात्र जसजशी प्रक्रिया पुढे सरकत होती तिला अस्वस्थ वाटू लागलं. तिने तसं सांगितलंही. पतीने यासंदर्भात माहिती देत पत्नीला अस्वस्थ वाटत असल्याचं तेथील कर्मचाऱ्यांना कळवलं. मात्र एमआरआय सेंटरमधील टेक्निशिएनने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केलं आणि त्यांना मशीनमध्ये असताना हलचाल करायला सांगू नका अशी उलट सूचना देण्यास सांगितलं. मात्र एमआरआयची प्रतिक्रिया संपल्यानंतर जेव्हा मशीन बाहेर आलं तेव्हा ही महिला मृतावस्थेत आढळून आली. त्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी तिचा मृत्यू सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला आहे. 

एमआरआयमध्ये नेमकं करतात काय?

एमआरआयमध्ये शरीराच्या आतील भागातील अवयवांची स्कॅनिंग केली जाते. एमआरआय मशीनमध्ये मोठ्या आकाराचे लोहचुंबक, रेडिओ वेव्हज आणि कंप्युटरच्या मदतीने शरीराच्या आतील भागातील अवयवांचं स्कॅनिंग केलं जातं. एमआयआर स्कॅनिंगच्या माध्यमातून ट्युमर्स, इन्फेक्शन, वेगवेगळ्या अवयवांना होणारा रक्तपुरवठा सुरळीत आहे की नाही, रक्तवाहिन्यांसंदर्भातील समस्यांसंदर्भात अंदाज बांधता येतात. 

एमआरआय धोकादायक?

एमआरआय करणं हे सुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगता. एमआरआयचा सर्वसामान्यांना काहीच त्रास होत नाही. काही ठराविक गोष्टींची काळजी घेतली तर एमआयआर घातक ठरत नाही. मात्र शस्रक्रीया करुन शरीरामध्ये मेटल प्लेट्स अथवा पेसमेकरसारख्या गोष्टी असतील तर त्यासंदर्भात आधी माहिती देणं अपेक्षित असतं. अशाप्रकारे इम्प्लांटेशन असलेल्या व्यक्तींसाठीही एमआरआय सुरक्षित असतं मात्र त्यासाठी विशेष काळजी घेणं अपेक्षित मानलं जातं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button