देश

मुंबईत हाय टाइडचा इशारा, समुद्र भरतीच्यावेळी 4.26 मीटरच्या उंच लाटांचा धोका

Mumbai Monsoon Alert : राज्याची राजधानी मुंबईत मान्सूनने वेळे आधीच धडक दिली आणि पहिल्याच पावसातच मुंबईची दाणादाण उडाली. मुसळधार पाऊस पडल्यानंतर रस्ते, रेल्वे रुळ पाण्याखाली गेलेत आणि लोकल सेवा ठप्प झाली. दरम्यान, मुंबईत हाय टाइडसंदर्भात (High Tide in Mumbai Today) इशारा देण्यात आला आहे.

समुद्रात 4.26 मीटरच्या लाटा उसळतील
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार आज दुपारी 12.17 वाजता मोठ्या भरतीची शक्यता आहे आणि यावेळी समुद्रामध्ये 4.26 मीटरच्या लाटा (High Tide) येतील. इशारा देताना हवामान खात्याने सांगितले की, मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, जोरात भरतीच्या वेळीही जर पाऊस पडला तर मुंबईकरांना प्रचंड त्रास सहन करावा लागू शकतो.

मालाडमध्ये 4 मजली इमारत कोसळली
बुधवारपासून मुंबईतील बर्‍याच भागात मुसळधार पाऊस पडत आहे आणि त्याचदरम्यान मालाडच्या मालवणी भागात एक चार मजली इमारत अचानक कोसळली. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे जवळपासच्या दोन निवासी इमारतींचेही नुकसान झाले असून त्या खाली करण्यात आल्या आहेत.

मुंबईसह अनेक शहरांमध्ये रेड अलर्ट जारी
काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देत भारतीय हवामान खात्याने (IMD) मुंबई आणि शेजारील ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यानंतर एनडीआरएफचे अनेक पथकही तैनात करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button