देश

कोकणात ढगफुटीचा इशारा, रत्नागिरीसाठी हे दोन दिवस महत्वाचे

राज्यात मान्सून ( Monsoon active in Maharashtra) दाखल झाल्यानंतर तडाखा देण्यास सुरुवात केली आहे. राज्यात जवळजवळ सर्वच जिल्ह्यात पाऊस पडत आहे. तर कोकणात (Konkan) ढगफुटीचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने (Weather Alert ) अंदाज वर्तवल्याप्रमाणे आता रत्नागिरी जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे आहेत. सध्या जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या जोरदार पाऊस कोसळत आहे. (Heavy Rains in Ratnagiri) रत्नागिरी जिल्ह्यात 11 आणि 12 जून रोजी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा पाऊस ढगफुटीप्रमाणे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी खबरदारीचा आदेश दिला आहे.

हवामानात होणारे बदल पावसाची पुढची स्थिती अधिक स्पष्ट होईल. सध्याच्या अंदाजनुसार रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार (Weather Forecast) जिल्ह्यात अतिमुसळधार (Heavy Rain) पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो. यामुळे 11 आणि 12 जून या कालावधीत जिल्ह्यात कर्फ्यु लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली.

मान्सून चांगला सक्रीय झाला आहे. 12 जून नंतरदेखील पावसाचा धोका कायम असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, राजापूर या तीन नगरपालिका आणि 31 गावांसाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या तीन शहरात नदीच्या पुराचे पाणी घुसते. त्यामुळे धोका कायम आहे. या ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आखण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं

दरम्यान, मुंबईला पहिल्याच पावसाने झोडपले आहे. पहाटेपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. रेल्वे रुळांवर पाणी, रस्त्यांवरील वाहतूकही धिमी झाली आहे. मुंबईत पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button